भूमी (लँड) जिहादचे मोठे उदाहरण : गुजरातमधील बेट द्वारका !

जरासंधाकडून मथुरेवर वारंवार होणार्‍या आक्रमणांपासून मथुरावासियांचे आणि सामान्य जनांचे रक्षण व्हावे, यासाठी भगवान श्रीकृष्णाने गुजरात येथील ज्या स्थानी आश्रय घेतला, ते स्थान म्हणजे द्वारका ! श्रीकृष्णभूमी म्हणून द्वारका आपल्याला सुपरिचित आहे. या श्रीकृष्णभूमी द्वारकेचे ३ भाग पडतात. त्यात एक म्हणजे गोमती द्वारका (जी गोमती नदीशेजारी आहे.), दुसरी ‘बेट द्वारका’ जी सध्या समुद्रात आहे आणि तिसरा भाग म्हणजे सुदामा द्वारका (श्रीकृष्णाने सुदामासाठी जी द्वारका वसवून दिली ती) ! यांपैकी बेट द्वारकेवर धर्मांधांनी शेकडो अनधिकृत मजारी, मशिदी यांची बांधकामे करून द्वारकेची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. याविषयी या लेखातून जाणून घेऊया !

बेट द्वारकेवरील अवैध मशिदीचे संग्रहित चित्र

१. द्वारकेचा इतिहास !

मुख्य अशा गोमती द्वारका आणि बेट द्वारका यांमधील भेद गुजरात येथील पुजारी सांगतात. त्यानुसार श्रीकृष्णाचे राज्यव्यवहार करण्याचे अथवा त्याचे राज्याचे कार्यालयाचे ठिकाण, म्हणजे भूमीवरील द्वारका नगरी अथवा गोमती द्वारका आहे. जेथे श्रीकृष्ण त्याच्या राण्यांसह रहायचा, जेथे श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली, ते ठिकाण म्हणजे सध्याची समुद्रातील द्वारका अथवा बेट द्वारका आहे. हे स्थान समुद्रातील एका बेटाप्रमाणे असल्यामुळे गुजरात येथे ते बेट द्वारका म्हणून प्रसिद्ध आहे. गोमती द्वारकेपासून बेट द्वारकेला जाण्यासाठी ३० कि.मी. अंतर भूमीवरून, तर त्यापुढील अंतर नावेतून अर्धा घंट्याचा प्रवास करत पार पाडावे लागते. जेव्हा श्रीकृष्णाचा परममित्र सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आला, तेव्हा द्वारकेचे वैभवशाली रूप पाहून तो आश्चर्यचकित झाला. तेथील भव्य प्रासाद, घरे यामुळे त्याचे डोळे दिपून गेले; मात्र त्याला द्वारकेत प्रवेश करण्याचे द्वारच सापडेना. तो सारखा ‘द्वार कहा ?, द्वार कहा ?’, असे म्हणत दरवाजाचा प्रवेश करत राहिला. तेव्हापासूनच या भूभागाला द्वारका हे नाव पडले.

श्री. यज्ञेश सावंत

२. बेट द्वारकेचे माहात्म्य !

बेट द्वारकेत साक्षात् भगवान श्रीकृष्ण वास्तव्याला होता. या भागाचे पूर्वीचे नाव ‘शंखोधर’ असे आहे; कारण येथे अनेक शंख सापडतात. भगवान श्रीकृष्णाचा विरह सहन करण्यास लागल्यामुळे त्याचे रूप आपल्या समवेत सारखे असावे; म्हणून रुक्मिणीमातेने एक सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती सिद्ध केली, तीच मनोहारी मूर्ती येथे आहे. भगवान श्रीकृष्णाची परमभक्त मीराबाई यांनी श्रीकृष्णभक्तीत रममाण होत ती एक दिवस याच मूर्तीत  विलीन झाली, ती चैतन्यदायी मूर्ती येथे आहे. येथील मातीच्या कणाकणांमध्ये श्रीकृष्ण आहे, परम योगेश्वर श्रीकृष्णाच्या वास्तव्याने येथील सर्वच गोष्टी पावन झाल्या आहेत.

३. बेट द्वारकेची सध्याची स्थिती !

बेट द्वारकेला जाण्यासाठी जेव्हा आपण गुजरातच्या किनारपट्टीवर येतो, तेव्हा तुम्हाला अनेक बुरखाधारी महिला, मुसलमान पुरुष दिसतात. तेव्हा एक क्षण प्रश्न पडतोच की, आपण नेमके श्रीकृष्णभूमीकडे जात आहोत कि अन्यत्र कुठे जात आहोत ? नावेतून बेट द्वारकेवर पोचल्यावरही तेच दृश्य दिसते. अनेक मुसलमान आणि बुरखाधारी मुसलमान महिला दिसतात. बेट द्वारकेच्या जवळ येतांना दूर अंतरावरील मोठ्या मशिदी दिसतात. जेव्हा श्रीकृष्णाच्या मंदिरात दर्शन घेतो, तेव्हा तेथील पुजारी मंदिराची माहिती सांगतात आणि शेवटी विनंती करतात, ‘‘येथे १० सहस्र मुसलमान आणि दीड सहस्र हिंदू रहातात, त्यात ३०० ब्राह्मण, म्हणजे पुजारी आहेत. येथील मुसलमानांचा व्यवसाय मासेमारी आहे. त्यामुळे आम्हाला वेगळे उत्पन्न नाही, तेथे काही पिकत नाही, तर तुम्ही स्वखुशीने तांदुळादी धान्य अर्पण करू शकत असल्यास तसे करावे.’’ पुजार्‍यांच्या पूर्वी हाच भाग न्यूनाधिक फरकाने ज्या बसगाड्या आपल्याला गोमती द्वारकेतून बेट द्वारकेच्या किनार्‍यावर सोडण्यासाठी येतात, त्यातील बसवाहकही सांगतात. ‘ब्राह्मण कुटुंबीय आणि हिंदु यांच्यासाठी काही दान-धर्म करा’, असे सांगावे लागण्यासारखी परिस्थिती हिंदूबहुल भारतातील एका तीर्थक्षेत्री येणे, ही खरी भयावह स्थिती आहे, तसेच पोलीस-प्रशासन यांच्यासाठीही लाजिरवाणे आहे. एक चांगले म्हणजे की, ‘यात्रेकरू हिंदूंना त्यांच्या धर्मबांधवांसाठी काहीतरी करा, याची जाणीव करून दिली जाणे’, हे या निमित्ताने घडत आहे.

४. बेट द्वारकेवर अवैध मजारी आणि मशिदी यांची बांधकामे

बेट द्वारकेवर शेकडो अवैध मजारी (इस्लामी पीर किंवा फकिर यांचे थडगे), मशिदी यांची बांधकामे गत २ ते ३ दशकांमध्ये झाली, ज्याची माहिती ना गुप्तचर यंत्रणेला मिळाली, ना शासन-प्रशासन यांना, हे आश्चर्यकारक आहे. गतवर्षी म्हणजे वर्ष २०२२ मध्ये जेव्हा गुजरात सरकारला ‘बेट द्वारका येथे काहीतरी मोठे षड्यंत्र घडत आहे’, असे लक्षात आले, तेव्हा त्यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून अनधिकृत मजारी, मशिदी आणि अन्य बांधकामे पाडली. विशेष म्हणजे ज्या मजारी पाडल्या, त्यामध्ये एकामध्येही पुरलेले शव आढळले नाही. अनुमाने १ लाख चौरस फूट एवढी भूमी अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आली. यातील बहुतांश जागा ही सरकारी आहे, हे विशेष ! जाणकारांच्या मते वर्ष १९६० मधील येथील लोकसंख्येचे आकडे सांगतात की, येथे तेव्हा हिंदूंची लोकसंख्या २ सहस्र ७८६ होती, तर मुसलमानांची केवळ ६०० होती. आज मुसलमानांची लोकसंख्या अनेक पटींनी वाढून १० सहस्रांहून अधिक, तर हिंदूंची न्यून झाली आहे.

५. लँड जिहादचा मोठा प्रयत्न

एवढ्या मोठ्या प्रमाणात अगदी शांततेत एवढी अनधिकृत मदरसे, मशिदी यांची बांधकामे कशी काय उभी राहिली ? हा शासन-प्रशासन यांच्यासमोरील प्रश्न आहे, तर शासन-प्रशासन यांना हे का लक्षात आले नाही ? हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे. काही शोध पत्रकारांनी या अनधिकृत बांधकामांचा शोध घेतल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. बेट द्वारकेपासून पाकमधील कराची हे बंदर केवळ ३०० किमी दूर म्हणजे केवळ काही घंट्यांवर आहे. कराचीतून अनेक पाकिस्तानी धर्मांध ज्या काळात शासन-प्रशासन यांचे या भागाकडे दुर्लक्ष झाले, त्या काळात येथे गुपचूप येऊन वास्तव्याला आले. मुख्य म्हणजे येथील हिंदु कुटुंबातील मुलींना स्थानिक धर्मांधांनी लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्याशी विवाह केले. यामध्ये पाकमधील धर्मांधांचा सहभाग आहे. परिणामी धर्मांधांची संख्या वाढली आणि हिंदूंची संख्या अल्प झाली. धर्मांधांनी हिंदूंच्या मालमत्ता खरेदी केल्या. सर्वसाधारण मुसलमानबहुल भागात हिंदूंना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्या समस्यांना येथील हिंदूंना सामोरे जावे लागले.

सर्वांत धक्कादायक म्हणजे या अवैध बांधकामांच्या मागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पी.एफ्.आय.) हात असल्याचे लक्षात आले. या बांधकामांसाठी लागणारा पैसा पुरवण्याचे काम, नियोजनबद्धपणे ही बांधकामे उभी करण्याचे काम पी.एफ्.आय.ने केले  आहे. हिंदूंसाठी चार धामांपैकी एक असलेली द्वारका नगरी आहे आणि तेथेच धर्मांधांनी अशी अनधिकृत बांधकामे करण्याची हिंमत करणे, हे सरकार आणि हिंदू या दोहोंसाठी आव्हानात्मक आहे. वक्फ बोर्डाने याही पुढे जात तेथील २ बेटांवर त्यांचा दावा सांगत ती पूर्ण बेटेच वक्फची भूमी आहे, असे सांगितले. हा निर्माण केलेला वाद सर्वाेच्च न्यायालयात गेल्यावर सर्वाेच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला फटकारत श्रीकृष्णाची कर्मभूमी वक्फच्या मालकीची कशी असू शकते ? वक्फ त्यावर दावा तरी कसा करू शकते ? असे फटकारत याचिका निकाली काढली आहे. हिंदूंच्या प्रत्येक प्रसिद्ध मंदिराच्या, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी धर्मांध त्यांची बांधकामे करून मंदिरांच्या रूपाने असलेला हा चैतन्याचा स्रोतच नष्ट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, हे लक्षात येते.

६. सरकारकडून अपेक्षा

किनारपट्टीच्या भागातील धर्मांधांनी लँड जिहादकडून किनारपट्टीच्या जागा बळकावणे, हा देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्यात हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हे केले जाते, हे भयावह आहे. द्वारकेच्या आसपासच्या भागातील  धर्मांधांच्या बांधकामांवर सरकारने कारवाई चालूच ठेवल्यावर धर्मांध त्यांच्या नौका आणि अन्य साहित्य घेऊन आसपासच्या गावांमध्ये जाऊन वास्तव्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात आले. त्यामुळे तेथे स्थानिकांसमवेत वाद होऊन दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. अजूनही धोका टळलेला नाही. द्वारकाधिशाच्या येथील मंदिराचे बांधकाम अजून चालू आहे. सरकारचे लक्ष हटताच अशी बांधकामे स्थानिक धर्मांधांकडून पुन्हा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून द्वारकेजवळील ओखापासून बेट द्वारकेला पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे बेट द्वारका रस्ते मार्गाने जोडले जाईल.

बेट द्वारकेला घेऊन जाणार्‍या प्रवासी बोटींमध्ये क्षमतेहून अधिक प्रवाशांना खेटून बसवत समुद्रातून प्रवास केला जातो. तेथे गर्दी नियंत्रणात करण्यासाठी कुणी उपलब्ध नसतो, उलट बोट प्रवासी वाहतूक करणारे बोटीतील बसण्याच्या जागा भरल्या, तरी प्रवाशांना उभ्या उभ्या नेतात. त्यावर कुणाचे तरी नियंत्रण हवे.

द्वारकाधीश मंदिराजवळच्या समुद्रात काही फुटांवर द्वारकानगरीचे अवशेष आहेत. त्यातील एका भिंतीचा विस्तार तर पाण्याखालून सूरतपर्यंत आहे. यातून श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीची भव्यता, व्याप्ती लक्षात येऊ शकेल. समुद्राखालील या द्वारकेची माहिती, त्याविषयीचे संशोधन हिंदूंपर्यंत लवकर पोचवावे. येथील भागाचे हिंदूंना व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडेल, याची व्यवस्था सरकारने करावी.

श्रीकृष्ण, श्रीराम हे हिंदूंसाठी आदर्श आहेत. त्यांनी वास्तव्य केलेले प्रत्येक क्षेत्र, ठिकाण हे हिंदूंसाठी परमपवित्र आणि पूजनीय आहे. हा हिंदूंचा वैभवशाली, गौरवशाली इतिहास आहे. या स्थानांचे जतन, जोपासना आणि संरक्षण होणे, हे हिंदूंच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आवश्यक आहे. सरकारने ते करावे आणि हिंदु समाजाने सतर्क आणि सजग राहून केवळ दर्शनार्थी न बनता, येथील चैतन्य, पावित्र्य अल्प करू पहाणार्‍या प्रत्येक घटनेविषयी आवाज उठवावा, ते रोखण्याचा प्रयत्न करून धर्मसेवा साध्य करावी, ही अपेक्षा !

। ॐ नमो भगवते वासुदेवाय ।

श्री गुरुचरणार्पर्णमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, देवद, पनवेल. (१७.१२.२०२३)