गोवा : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा यांच्या विरोधात गुन्हा नोंद

पोलिसांनी नाझारियो डिसोझा याला अन्वेषणासाठी बोलावले आहे. सामाजिक माध्यमातून गोव्यातील आर्चबिशप यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा याच्या विरोधात यापूर्वी एकदा गुन्हा नोंदवला गेला आहे.

स्विडनच्या संसदेबाहेर कुराण जाळले !

स्विडनच्या संसदेबाहेर १४ ऑगस्ट या दिवशी इराकी वंशाच्या सलवान मोमिका यांनी कुराण जाळले. यापूर्वी मोमिका यांनीच २८ जून या दिवशी स्विडनच्या न्यायालयाकडून अनुमती घेऊन एका मशिदीबाहेर कुराण जाळले होते.

चावडी, काणकोण (गोवा) येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीला मद्यालयाच्या मालकाचा विरोध

शाळेजवळील मद्यालय बंद करून त्याला अनुज्ञप्ती देणार्‍या अबकारी खात्याच्या अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !

नगर येथे भुईकोट गडामध्ये देशविरोधी घोषणा देणारे ५ जण कह्यात !

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला शहराजवळील ऐतिहासिक भुईकोट गडामध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. यासंदर्भात तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेले भारतीय सैनिक आणि भिंगार कँप येथील पोलीस यांनी एकूण ५ जणांना कह्यात घेतले आहे.

पाकमधील राजकीय गोंधळ !

पाकिस्‍तानात अजूनही खानदान आणि कबिले यांच्‍यावर राजकारणाचे स्‍वरूप ठरत असते. अशा देशातील जनतेचे अन्‍नाविना हाल झाले, तरी त्‍याचे तेथील राजकीय लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नसते. इम्रान खान यांना शिक्षा केल्‍यावर पाकिस्‍तानात नवा अध्‍याय चालू होईल; पण तो सुडाचा, द्वेषाचा आणि अहितकारी असेल.

गोवा : सोनसोडोवरून येणारे कचरावाहू ट्रक पिळर्ण येथे रोखले

हे ट्रक कचरा वाहून नेत असतांना त्याच्यातून घाण पाणी रस्त्यावर सांडत होते. ही गोष्ट पिळर्ण येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने हे ट्रक अडवले.

गोवा : खाण क्षेत्रातील गावांतील नागरिकांची पुन्हा जनसुनावणी घेण्याची मागणी

नागरिकांना अंधारात ठेवून खाण व्यवसाय रेटला जात आहे. गेल्या ५० वर्षांत खाणींमुळे सुपीक भूमी आणि जलस्रोत नष्ट झाले. त्यामुळे पुढील ५० वर्षांत आणखी किती हानी होईल ?, याची कल्पनाच करू शकत नाही.

अराजकतेच्‍या उंबरठ्यावर ‘पाप’स्‍तान !

पाकिस्‍तानमधील अनेक प्रांतांमध्‍ये उठावासारखी स्‍थिती असून पाकिस्‍तानचे तुकडे होण्‍याचीही शक्‍यता असल्‍याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्‍यक आहे. या स्‍थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्‍याप्‍त काश्‍मीर मुक्‍त करावा. असे झाल्‍यास तो जागतिक स्‍तरावरील मुत्‍सद्देगिरीचा एक उत्‍कृष्‍ट नमुना ठरेल !

गोवा : रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प रहित करण्यासाठी विरोधकांचा सरकारवर दबाव

क्षिण-पश्चिम रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण प्रकरणाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तरीही गोव्यात या प्रकल्पाचे काम चालू आहे. सरकारने हा प्रकल्प रहित करावा.

महिलांच्‍या विरोधातील गुन्‍ह्यांविषयी दाखवला जाणारा दुटप्‍पीपणा !

महिलांचे कपडे उतरवण्‍यासारखे अमानवी कृत्‍य होणे आणि त्‍याचा राजकारण म्‍हणून वापर करून त्‍या दृष्‍टीने या गुन्‍ह्यांकडे पहाणे, ही सभ्‍य समाजासाठी धोक्‍याची घंटा आहे.