नगर येथे भुईकोट गडामध्ये देशविरोधी घोषणा देणारे ५ जण कह्यात !

नगर – स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला शहराजवळील ऐतिहासिक भुईकोट गडामध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. यासंदर्भात तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेले भारतीय सैनिक आणि भिंगार कँप येथील पोलीस यांनी एकूण ५ जणांना कह्यात घेतले आहे. परवेज इजाज पटेल (वय २१ वर्षे) आणि अरबाज शेख या दोघांसह तीन अल्पवयीन मुलांचा यांत समावेश आहे.

सौजन्य नगर न्यूज २४ 

१. भुईकोट गडामध्ये पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांना ब्रिटिशांनी कैदेत ठेवले होते. पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ याच ठिकाणी वास्तव्य करतांना लिहिला होता.

२. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन अशा राष्ट्रीय उत्सवांच्या वेळी ऐतिहासिक भुईकोट गड प्रेक्षकांना पहाण्यासाठी खुला ठेवला जातो; पण सध्या हा गड सैन्याच्या कह्यात आहे.