चालू आर्थिक वर्षांत २ सहस्र रुपयांच्या नोटा छापल्या जाणार नाहीत !

मूल्याच्या दृष्टीने मार्च २०२१ मध्ये ४ लाख ९० सहस्र कोटी रुपयांच्या २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनात होत्या, तर मार्च २०२० मध्ये त्याचे मूल्य ५ लाख ४८ सहस्र कोटी रुपये होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडताच तहसीलदाराने गॅस शेगडीवर जाळले लाखो रुपये !

अशा भ्रष्टाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !

महागाईमुळे व्हेनेझुएलाने छापली १० लाख रुपयांची नोट !

व्हेनेझुएलामध्ये राजकीय अराजक माजल्यामुळे देश संकटाच्या खाईत लोटला असून महागाईने परिसीमा गाठली आहे. अराजक माजल्यावर आर्थिक चलनाचे कसे अवमूल्यन होते, याचे हे उदाहरण होय !

नोटांवर नेताजी बोस यांचे छायाचित्र छापण्यास केंद्र सरकारला आदेश देण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली !

नेताजी सुभाषचंद्रच नव्हे, तर देशातील असंख्य क्रांतीकारकांनी देशासाठी प्राणांचे बलीदान दिले आहे. हे पहाता केवळ ‘एका’च नेत्याचे छायाचित्र नोटांवर का ?, असा प्रश्‍न नेहमीच भारतियांच्या मनात येतो !

५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीत ! – रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी ‘५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात येणार आहेत’, असे वृत्त प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले होते; मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, जुन्या नोटा वैध असून त्या चलनात कायम रहातील.

नोटा हाताळल्यास हात स्वच्छ धुवा ! – इंडियन बँक्स असोसिएशनचे आवाहन

चलनी नोटा हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, तसेच नोटा किंवा नाणी हाताळून संसर्गाला आमंत्रण देण्यापेक्षा लोकांनी डिजिटल बँकिंगचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन इंडियन बँक्स असोसिएशनने नागरिकांना केले आहे.