|
नवी देहली – वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत देशात निरनिराळ्या मूल्याच्या २० लाखांहून अधिक बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली.
The government on Wednesday informed the Rajya Sabha that nearly 8.35 lakh pieces of #counterfeit notes, including 2.44 lakh pieces of Rs 2000 denomination, were seized last yearhttps://t.co/6YoRwxNyNs
— Economic Times (@EconomicTimes) February 2, 2022
राय यांनी सांगितले की, २ सहस्र रुपये मूल्याच्या ४ लाख ६७ सहस्र ३४६ बनावट नोटा, बंदी घालण्यात आलेल्या १ सहस्र रुपये मूल्याच्या ५ लाख २२ सहस्र ३८१ आणि ५०० रुपयांच्या २ लाख ९७ सहस्र ३७२ नोटा या ५ वर्षांच्या कालावधीत पकडण्यात आल्या. याच काळात २०० रुपये मूल्याच्या ४३ सहस्र ४०६ आणि १०० रुपये मूल्याच्या ३ लाख ४३ सहस्र ४८३ बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या.