अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी यांचे राज्य परिवहन मंडळाच्या बँकेतील संचालकपद रहित

सदावर्ते चुकीचा कारभार करत असल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सदावर्ते यांनी नियम मोडल्याचे निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली.

मुंबईत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोकड आणि अवैध मद्य जप्त !

निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सर्वत्र होणारे अपप्रकार व्यवस्थेचे अपयश दर्शवतात !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दिवा आणि मुंब्रा येथील काही भागांत ८ घंटे पाणी बंद रहाणार; इ.व्ही.एम्. जिथे ठेवली आहेत, तिथे कडक पहारा !…

दिवा येथील शीळ, खर्डी आणि भोलेनाथनगर, तसेच मुंब्रा येथील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्नीशमन केंद्रापर्यंतच्या भागात ९ मे सकाळपासून १० मे सायंकाळपर्यंत ८ घंटे पाणीपुरवठा बंद रहाणार आहे.

विधान परिषदेच्या ४ मतदारसंघाच्या निवडणुका घोषित : १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी !

लोकसभेची निवडणूक ऐन भरात असतांना विधान परिषदेच्या २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्या आहेत. त्यासाठी १० जूनला मतदान, तर १३ जूनला मतमोजणी होईल.

UK Researchers Reconstructed Face : ७५ सहस्र वर्षांपूर्वीच्या महिलेचा चेहरा आला समोर; शास्त्रज्ञांनी लावला मोठा शोध !

ब्रिटनमधील पुरातत्व तज्ञांच्या पथकाने ७५ सहस्र वर्षांपूर्वीच्या ‘निएंडरथल’ महिलेचा चेहरा सिद्ध केला आहे. या महिलेचा चेहरा कवटी वापरून सिद्ध करण्यात आला आहे.

महापािलका अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त : फेरीवाले मोकाट !

महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने शहरातील अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया, फेरीवाले यांचे चांगलेच फावले आहे.

मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईत सावत्र पित्याला अटक !

पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार डॉ. पाटकर यांना संजय राऊत धमकावत असल्याचा आरोप !

पत्राचाळ प्रकरणात १ सहस्र ३४ कोटी रुपयांच्या घोटाळा करून पैशांची अफरातफर (मनी लाँड्रिंग) केल्या प्रकरणी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांची चौकशी करत आहे.

आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापकपदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख यांची हकालपट्टी करा ! – हिंदु जनजागृती समितीची

हमाससारख्या क्रूर आतंकवादी संघटनेचे समर्थन करूनही त्याविषयी अपराधीपणाची भावना न बाळगता, उलट स्वत:च्या देशद्रोही कृतीचे समर्थन करणार्‍या सोमय्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्यशासनाकडे केली आहे.

‘हमास’विषयी सहानुभूती दाखवणार्‍या मुख्याध्यापिकेकडे व्यवस्थापनाने मागितले स्पष्टीकरण !

सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी २४ एप्रिल या दिवशी हमासची तळी उचलणार्‍या एका संदेशावर सकारात्मक मत व्यक्त केले होते.