काबुल (अफगाणिस्तान) – शेजारील अफगाणिस्तानातील तालिबान सरकारशी भारताचे संबंध सुधारत असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी काबुलमध्ये भारतीय अधिकार्यांच्या भेटीचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते आणि आता तालिबान सरकारने मुंबईत त्याचा दूत तैनात केला आहे. इकरामुद्दीन कामिल यांची मुंबईतील अफगाण मिशनमध्ये कार्यवाहक वाणिज्यदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Taliban Announces Appointment of Ikramuddin Kamil as ‘Acting Consul’ at Mumbai mission
The announcement comes days after the EAM official in Afghanistan held talks with the Taliban’s acting defence minister, Mullah Mohammad Yaqoob, in Kabul.#Diplomacy pic.twitter.com/GhTk67GXW5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 13, 2024
काबुलमधील तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली. या घडामोडींकडे भारतात तालिबानची राजनैतिक उपस्थिती वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे भारतातील कोणत्याही अफगाण मिशनमध्ये तालिबानने केलेली ही पहिलीच नियुक्ती आहे.