दळणवळण बंदीच्या शक्यतेमुळे मुंबईतील रेल्वेस्थानकांवर गावाला जाणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ एप्रिल या दिवशी जनतेशी साधलेल्या ‘ऑनलाईन’ संवादामध्ये ‘येत्या २ दिवसांत दळणवळण बंदीविषयी निर्णय घेण्यात येईल’, असे म्हटले होते.

पोलिसांची अल्पसंख्यांक आणि हिंदु यांच्याविषयी रंग पालटणारी धर्मनिरपेक्षता !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

मुंबईत कोरोना लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पार !

१ मार्चपासून तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण चालू झाले. या अंतर्गत आज लसीकरणाच्या संख्येचा १० लाखांचा टप्पा पार झाला असून आजपर्यंत एकूण १० लाख ८ सहस्र ३२३ इतके लसीकरण करण्यात आले आहे.

ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित कारखाने 

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक नागरीकरण असलेल्या ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित कारखाने आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून समोर आली आहे.

प्रभादेवी येथील इलेक्ट्रिक वायरच्या गोदामाला आग

वायरच्या गोदामाचा तळमजला आणि बेसमेंटमध्ये आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मुंबईमध्ये नात आणि मुलगी यांच्यावर बलात्कार करणार्‍या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

अशा प्रकारच्या घटना हे समाजातील वाढत्या व्यभिचाराचे लक्षण आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच समाजाची झालेली ही अधोगती लक्षात घेऊन आतातरी नैतिक शिक्षण देणार्‍या शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा !

माथाडी कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांची नवी मुंबई येथे ३९ वी पुण्यतिथी साजरी

माथाडी कामगार संघटनेचे (संस्थापक) स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची ३९ वी पुण्यतिथी २३ मार्च या दिवशी नवी मुंबईतील माथाडी भवन येथे साजरी करण्यात आली. यानिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता.

होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षेसाठी मुंबई अन् पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

रंगपंचमीच्या दिवशी असे अपप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंद का झाला नाही ? याविषयी २ आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा ! – मुंबई उच्च न्यायालय

पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले; मात्र या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

‘जे आरोप तुम्ही केले आहेत ते गंभीर आहेत यात शंका नाही; मात्र हे प्रकरण एवढे गंभीर होते, तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत ?’ – सर्वोच्च न्यायालय