पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची न्यायालयात याचिका
मुंबई – पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. यावर न्यायालयाने येत्या २ आठवड्यांत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
The 22-year-old TikTok star died after falling from a building on February 8, and Pune police said they were probing a suicide angle#Maharashtra #BombayHighCourt
(@journovidya)https://t.co/FQSnmxAiOQ— IndiaToday (@IndiaToday) March 25, 2021
राज्य सरकारच्या अधिवक्त्यांनी तरुणीच्या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही. मग याचिकाकर्ते कोणत्या उद्देशाने ‘तक्रार नोंदवा’, असे सांगत आहेत ? असा प्रश्न न्यायालयात उपस्थित केला आहे. २४ मार्च या दिवशी न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली. पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले; मात्र या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.