होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षेसाठी मुंबई अन् पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

निवेदन स्वीकारतांना मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर (डावीकडून दुसरे) भाजपचे श्री. संगठन शर्मा, समितीचे श्री. अभिषेक मुरुकटे

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव ! दारू पिऊन धिंगाणा घालणे, रेव्ह पार्ट्या करणे, रासायनिक रंग फासणे, महिलांना पाण्याचे फुगे मारणे, त्यांची छेड काढणे यांसारखे, तसेच काही नास्तिक आणि धर्मविरोधी या सणांविरोधात धर्मश्रद्धांचे भंजन करणारे उपक्रम राबवतात. त्यामुळे होळी आणि रंगपंचमी या सणांचे पावित्र्य राखले जावे आणि महिलांना सुरक्षा मिळावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांनी प्रशासन अन् पोलीस यांंना निवेदन दिले आहे.

मुंबई

मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांना २३ मार्च या दिवशी निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना भाजपचे वरळी विधानसभा सचिव श्री. संगठन शर्मा, श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. प्रभाकर भोसले, राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. सागर भामल आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिषेक मुरुकटे उपस्थित होते. रंगपंचमीच्या दिवशी असे अपप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

पालघर

पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ (मध्यभागी) यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना २२ मार्च या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी अधिवक्ता मुरलीधर क्षीरसागर, सनातन संस्थेचे श्री. महादेव होनमोरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक, श्री. पंडित चव्हाण उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्‍चिम पोलीस ठाणे येथे निवेदन देतांना धर्मप्रेमी श्री. प्रतिक सांगले, श्री. पिंटू गुप्ता, श्री. कमल पुरोहित, श्री. आदर्श काळे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद काळे उपस्थित होते.

हिंदु मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिरे पुन्हा भक्तांच्या स्वाधीन करा ! – मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हिंदु मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिरे पुन्हा भक्तांच्या स्वाधीन करण्याविषयीचे निवेदनही या वेळी मुंबई जिल्हाधिकारी आणि पालघर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.