ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित कारखाने 

वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना कराव्यात !

प्रातिनिधिक चित्र

ठाणे – मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक नागरीकरण असलेल्या ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित कारखाने आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे-पालघर जिल्ह्यांतील १५ सहस्र ९३१ कारखान्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये प्रदूषित कारखान्यांच्या तीव्रतेनुसार त्यांना लाल, नारंगी, हिरवा आणि पांढरा रंग देण्यात आला आहे. ही संख्या ४ सहस्र ७४१ झाली आहे. कारखान्यांच्या संख्येमध्ये पुढे असणार्‍या पुणे जिल्ह्यामध्येही प्रदूषित कारखान्यांची संख्या ठाणे-पालघरपेक्षा न्यून आहे.