१ डिसेंबरपासून १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा चालू करण्यास मंत्रीमंडळाची अनुमती !

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ग्रामीण भागासह शहरी भागात १ ली ते १२ वीच्या शाळा चालू करण्यात येणार आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा प्रयत्न करू.

परमबीर सिंह यांनी आतंकवादी कसाब याचा दूरभाष लपवला !

निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण यांचा खळबळजनक आरोप : पठाण यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसह त्यांनी हा गंभीर प्रकार आतापर्यंत का उघड केला नाही ? याचीही चौकशी झाली पाहिजे !

राज्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा चालू होणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

सार्वजनिक आरोग्य विभागाने पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा चालू करण्यास अनुमती दिली आहे. २५ नोव्हेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय होणार आहे.

मालेगाव येथे दंगल घडवण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात !

साजिदा अहमद म्हणाल्या, ‘‘मालेगावाच्या ज्या भागात दंगल झाली, तेथे भाजपचे अस्तित्व नाही. या ठिकाणी दगड आधीच जमवून ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकांना चेतवण्यात आले.

(म्हणे) ‘रझा अकादमी केवळ धार्मिक कार्य करते !’ – जनता दल (सेक्युलर)

आझाद मैदान दंगलीत हुतात्मा स्मारकांची तोडफोड, महिला पोलिसांचा विनयभंग, पोलिसांवर आक्रमण, त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेविषयी चेतवून दंगल घडवणे, हेच रझा अकादमीचे धार्मिक कार्य आहे का ?

आज राज्य सरकारी चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांचा मंत्रालयावर मोर्चा !

मागण्यांमध्ये कर्मचार्‍यांची वेतनवाढ, कर्मचार्‍यांना कायम करणे, कर्मचार्‍यांना जुनी वेतनयोजना लागू व्हावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

एस्.टी.च्या संपावर लवकरच तोडगा निघेल ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

राऊत पुढे म्हणाले की, परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांविषयी सर्वांना सहानुभूती आहे. या संपाला राजकीय वळण लागले आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानी आंदोलन करणारे परिवहन महामंडळाचे कर्मचारी नव्हते. 

सरकारची फसवणूक करून राज्यातील काही वस्त्रोद्योजकांकडून वीजअनुदानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट !

मंत्र्यांकडून चौकशीचा आदेश; मात्र मनुष्यबळाअभावी कारवाईला विलंब, ५५ सहस्र उद्योगांची पडताळणी करण्यासाठी केवळ १० पथके

काँग्रेसला घरचा अहेर !

विश्वगुरु आणि महासत्ता बनण्याची क्षमता असणार्‍या भारताची काँग्रेसने जी दुरवस्था केली, त्यात पालट होण्याचा आरंभ चालू झाला आहे. काँग्रेसने केलेल्या अशाच शेकडो महाचुकांचे प्रायश्चित्त म्हणून आता उरल्यासुरल्या काँग्रेसलाही राजकारणातून विश्राम घेण्यास जनतेने भाग पाडले पाहिजे !

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !