मालेगाव येथे दंगल घडवण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात !

जनता दलाची (सेक्युलर) गृहमंत्री दिलीप विखे पाटील यांच्याकडे तक्रार

मालेगावमध्ये झालेली दंगल

मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – अमरावती, मालेगाव आणि नांदेड येथे घडलेल्या हिंसाचारातील दोषींना ‘सी.सी.टी.व्ही.’वरील चित्रणावरून अटक करून कायदेशीर कारवाई करावी. यामध्ये निरपराध लोकांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर या दिवशी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या वेळी मालेगाव येथे दंगल घडवण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हात आहे. याविषयी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जनता दल पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्यांक समाजाच्या अध्यक्षा साजिदा निहाल अहमद यांनी केली. या वेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डी.जे. कोळसे पाटील हेही उपस्थित होते. साजिदा अहमद यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना साजिदा अहमद म्हणाल्या, ‘‘मालेगावाच्या ज्या भागात दंगल झाली, तेथे भाजपचे अस्तित्व नाही. या ठिकाणी दगड आधीच जमवून ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकांना चेतवण्यात आले. याविषयी आम्ही गृहमंत्र्यांना माहिती दिली आहे.’’