आज राज्य सरकारी चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांचा मंत्रालयावर मोर्चा !

चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांचा विविध मागण्यांसाठी २५ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयावर मोर्चा

मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्य सरकारी चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांचा विविध मागण्यांसाठी २५ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. वारंवार पाठपुरावा करून आणि निवेदन देऊनही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्यांमध्ये कर्मचार्‍यांची वेतनवाढ, कर्मचार्‍यांना कायम करणे, कर्मचार्‍यांना जुनी वेतनयोजना लागू व्हावी आदी मागण्यांचा समावेश आहे.