१ डिसेंबरपासून १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा चालू करण्यास मंत्रीमंडळाची अनुमती !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने १ डिसेंबरपासून इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळा चालू करण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुमती देण्यात आली आहे. सध्या शहरी भागात ८ वी ते १२ वी आणि ग्रामीण भागात ५ वी ते १२ वीचे वर्ग चालू आहेत. राज्यात प्राथमिक शाळा चालू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि निवासी शाळा चालू करता येतील, असे कोरोनाविषयीच्या ‘टास्क फोर्स’ने राज्य सरकारला सांगितले.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ग्रामीण भागासह शहरी भागात १ ली ते १२ वीच्या शाळा चालू करण्यात येणार आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा प्रयत्न करू. शाळांनीही विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घ्यावी.