(म्हणे) ‘रझा अकादमी केवळ धार्मिक कार्य करते !’ – जनता दल (सेक्युलर)

आझाद मैदान दंगलीत हुतात्मा स्मारकांची तोडफोड, महिला पोलिसांचा विनयभंग, पोलिसांवर आक्रमण, त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेविषयी चेतवून दंगल घडवणे, हेच रझा अकादमीचे धार्मिक कार्य आहे का ? – संपादक

 

मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – रझा अकादमी ही संघटना कोणतेही राजकीय कार्य करत नाही. ती एक धार्मिक संघटना आहे. ती केवळ धार्मिक कार्य करत आहे, असे निवेदन जनता दलाच्या (धर्मनिरपेक्ष) अल्पसंख्य समाजाच्या महाराष्ट्र अध्यक्षा साजेदा अहमद यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.

या निवेदनात साजेदा अहमद यांनी म्हटले आहे की, त्रिपुरा येथे १२ नोव्हेंबर या दिवशी घडलेली घटना आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आले. मालेगाव शहरात ही सुन्नी जमीअतुल उलमा आणि रजा अकादमी यांनी संयुक्तपणे बंदचे आवाहन केले. हा बंद शांततापूर्ण पार पडल्यानंतर समाजकंटकांनी पोलिसांशी हुज्जत घालून बंदला गालबोट लावले. धार्मिक संघटना रझा अकादमीच्या कायालर्यावर अचानकपणे मध्यरात्री धाड टाकून पोलिसांनी भयाचे वातावरण निर्माण केले.’’