निवृत्तीवेतन धारकांची पायपीट !

निवृत्तीवेतन घेणार्‍यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने सर्व प्रकरणांची चौकशी करून निवृत्तीवेतन धारकांना न्याय द्यावा आणि कामचुकारपणा करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यावी, ही अपेक्षा !

सावंतवाडी नगरपालिकेच्या आयुर्वेदिक आणि क्षयरोग चिकित्सालयाला नगराध्यक्षांनीच टाळे ठोकले !

डॉ. मसुरकर वेळेत उपस्थित नसल्याने रुग्ण ताटकळत असल्याचे निदर्शनास आले.

ख्रिस्ती संघटना ‘लव्ह जिहाद’ला विरोध कधी करणार ?

कोची (केरळ) येथील सायरो मलबार चर्चच्या येथील कदवंथरा सेंट जोसेफ चर्चमध्ये मुसलमान तरुण आणि ख्रिस्ती तरुणी यांचा विवाह झाला होता. यावरून झालेल्या वादामुळे विवाह करून देणार्‍या पाद्य्राला क्षमा मागावी लागली.

देहलीमध्ये कोरोनामुळे होणार्‍या वाढत्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानामध्ये जागाच नाही !

देहलीमध्ये कोरोनामुळे १ सहस्र ४०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक मृतदेहांना स्मशानामध्ये जागा नसल्याने अंत्यसंस्कारापासून थांबवून ठेवण्यात आले आहे.

गोव्यात कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटक आल्यामुळे गोमंतकियांना धोका !

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर असलेल्या पर्यटकांच्या गर्दीत ना मास्कचा वापर, ना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन !

कॅसिनो चालू करण्याची अनुज्ञप्ती त्वरित मागे घ्या !

शासनाने तरंगते कॅसिनो बंद न केल्यास कॅसिनोंच्या कार्यालयांसमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील

पाकच्या ‘आय.एस्.आय.एस्.’शी संबंध असलेल्या ‘पी.एफ्.आय.’वर गोव्यात बंदी का नाही ? – प्रा. सुभाष वेलींगकर

प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ केली आहे.

गोव्यात शासकीय कर्मचार्‍यांची संख्या आवश्यकतेपेक्षा अधिक ! – ‘सीआयआय’ अहवाल

सत्तेवर आल्यावर काही लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मतदारसंघातील युवकांना रोजगार दिल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे, असे म्हटल्यास गैर नाही ! जनतेमध्येही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी धडपड चालू असते. त्यासाठी आर्थिक व्यवहारही होतात !

चुरू (राजस्थान) येथील गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू

गायींचा मृत्यू चार्‍यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

तहसीलदारांनी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार

दळणवळण बंदीच्या काळात येथील खानापूर तालुक्यात मार्च २०२० ते मे २०२० पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही या काळात पेंडल व्यवस्था, पोलीस बॅरिकेट्स, जेवण, ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ आणि इतर कामे यांसाठी ७५ लाख रुपये व्यय दाखवण्यात आला आहे.