राज्यशासनाच्या कारभाराला कंटाळूनच सुबोध जयस्वाल यांनी केंद्रशासनाकडे प्रतिनियुक्ती स्वीकारली ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्यशासन पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे. मुख्यमंत्र्यांनी देखरेखीचे काम करणे अपेक्षित असते; मात्र स्थानांतरापासून प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप होतांना दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या कारभाराला कंटाळूनच महासंचालकांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावह नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केंद्रात सहभागी होण्यासाठी पदाचे त्यागपत्र स्वीकारण्याची विनंती राज्यशासनाकडे केली होती. ती संमत झाल्यानंतर आता जयस्वाल यांची नियुक्ती औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून फडणवीस यांनी राज्यशासनावर टीका केली आहे.