‘कालोत्सव अणि जत्रोत्सव यांमध्ये चालणारा जुगार बंद करा’, अशी सत्तरी तालुक्यातील नागरिकांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस, प्रशासन आणि संबंधित देवस्थानचे व्यवस्थापन स्वतःहून जत्रोत्सवातील जुगार का बंद करत नाहीत ? जुगारवाल्यांच्या दहशतीपुढे प्रशासन नमते घेते का ?

संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले ? याचे अन्वेषण व्हायला हवे ! – किरीट सोमय्या, भाजप

अंमलबजावणी संचालनालयाने सौ. वर्षा राऊत यांना बँके’तील आर्थिक अपहाराप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी हे वक्तव्य केले आहे.

कर्नाटकच्या विधान परिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी विधान परिषद सभागृहामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी धर्मेगौडा यांच्याशी गैरवर्तन केले होते. त्यांना सभापतींच्या आसंदीवरून बलपूर्वक खेचून उठवले होते.

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात धारावी, मुंबई पोलीस ठाण्यात निवेदन

२६ डिसेंबर या दिवशी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांना निवेदन देण्यात आले.

भाजपच्या आमदाराने पूजेच्या ठिकाणी असलेली पूजा सामग्री लाथेने उडवली !

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे हुतात्मा स्मारकाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण न दिल्याने आमदाराची कृती ! भाजपच्या आमदारांकडून असे घडणे अपेक्षित नसून अशा प्रकारांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, हे निश्‍चित !

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यांवर ३५ सहस्र पोलिसांचा पहारा ! – विश्वास नांगरे पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोटरपणे पालन होण्यासाठी पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल.

पाकने क्षमा मागावी ! – आस्थापनाची मागणी

तुर्कस्तानचे आस्थापन अल्बायर्क अँड ओज्पॅक ग्रुपच्या कार्यालयावर काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून धाड टाकण्यात आली होती. पोलिसांनी आस्थापनाच्या काही कर्मचार्‍यांना कह्यात घेऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्रीचे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे प्रशासन आणि पोलीस यांना निवेदन

३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होतात.

नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीचे कागल तहसीलदारांना निवेदन

नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवावे, या मागणीचे निवेदन २१ डिसेंबर हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने कागल तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.

हरमल समुद्रकिनार्‍यावर अमली पदार्थासहित नायजेरियन नागरिक कह्यात

अमली पदार्थविरोधी पथकाने २४ डिसेंबर या दिवशी रात्री हरमल समुद्रकिनार्‍यावर वालांकिणी चॅपल या ठिकाणी आंतोनिया ओबीना या नायजेरियन नागरिकाला समवेत १५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले.