नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यांवर ३५ सहस्र पोलिसांचा पहारा ! – विश्वास नांगरे पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त

पोलिसांचे बारकाईने लक्ष

मुंबई – नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोटरपणे पालन होण्यासाठी पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यांवर ३५ सहस्र पोलिसांचा पहारा ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकारांना दिली.

या वेळी विश्वास नांगरे पाटील म्हणाले, ‘‘रात्रीच्या संचारबंदीमुळे ५ हून अधिक नागरिकांनी एकत्र येण्यावर बंदी आहे. लोक त्यांच्या कुटुंबासमवेत बाहेर पडले आणि ४ किंवा त्यापेक्षा अल्प जण असतील, तर काही अडचण नाही. बोट किंवा इमारतीची गच्ची या ठिकाणी पार्टीला अनुमती नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी विविध ठिकाणी विशेष पथके असणार आहेत. घातपाताचा धोका लक्षात घेऊनही मुंबई पोलीस सज्ज आहेत.’’