गायनाचा सराव करतांना हिंदी चित्रपटातील गीतात गाण्याच्या परिणामकारकतेसाठी शब्दांच्या अर्थांसमवेत त्याच्या उच्चारालाही तेवढेच महत्त्व असणे, भक्तीगीत आणि प.पू. भक्तराज महाराज लिखित भजनाच्या गायनाचा सराव करतांना शब्दांच्या उच्चारांपेक्षा भावाची जोड अधिक परिणामकारक ठरल्याविषयी साधकाला आलेले अनुभव
पहिल्या प्रयोगासाठी मी हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे निवडले होते. त्या गीतातील शब्द रज-तमप्रधान होते. गायनाचा सराव करतांना गीतातील केवळ शब्द गुणगुणत असतांना त्याचा माझ्या मनावर विशेष परिणाम होत नव्हता. त्यामुळे माझे मन स्थिर रहायचे.