
प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – गोरखपूर येथून आलेल्या भाविकांच्या एका समुहाने येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कक्षाला भेट दिली. त्यांनी कक्षातील सर्व फलकांची माहिती घेतली. संपूर्ण प्रदर्शन पाहिल्यानंतर त्यांनी कक्षातून जातांना उत्स्फूर्तपणे ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’, ‘गंगा माता की जय’, अशा घोषणा दिल्या.