‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हिंदु राष्ट्र स्थापनेचे (ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे) महान कार्य करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांना महर्षींनी, तसेच काही संतांनी देवतांच्या काही मूर्ती दिल्या आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी अत्यंत भक्तीभावाने या मूर्ती त्यांच्या देवघरात ठेवल्या आहेत. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान समष्टी कार्यात देवीदेवता त्यांना साहाय्य करतात. या कार्यासाठी काळानुरूप देवतांची तत्त्वे (म्हणजे त्या त्या देवतेतील शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने) ज्या प्रमाणात कार्यरत असतात, त्यानुसार देवतांच्या मूर्ती किंवा चित्रात ती प्रतिबिंबित होतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देवघरातील देवतांच्या मूर्ती आणि चित्रे यांसंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने लोलकाद्वारे संशोधन करण्यात आले. लोलकाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. हे संशोधन पुढे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील मूर्ती आणि चित्रे यांच्या नोंदी

सप्टेंबरच्या (२३.९.२०२४ या दिवशीच्या) तुलनेत डिसेंबरमध्ये (१३.१२.२०२४ या दिवशी) देवघरातील मूर्ती आणि चित्रे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत विलक्षण वाढ झाली आहे. हे पुढे दिलेल्या नोंदींतून लक्षात येते.
सारणीतील नोंदींविषयी –
१. रिडिंगच्या चढत्या क्रमवारीनुसार देवतांचा क्रम लावला आहे.
२. मूर्ती आणि चित्रे यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात येतात –
१. अवघ्या ३ मासांत देवघरातील मूर्ती आणि चित्रे, एवढेच नव्हे, तर पूजेतील अन्य वस्तू उदा. घंटा, शंख आदी यांच्यातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली आहे. यातून ‘काळानुरूप आणि कार्यानुरूप विविध देवीदेवतांची तत्त्वे पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली आहेत’, असे लक्षात येते.
२. देवघरातील दत्ताची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती, चांदीच्या गुरुपादुका, संतांची छायाचित्रे, श्री लक्ष्मीदेवी, श्रीराम आणि श्री दुर्गादेवी या देवतांची चित्रे यांच्यातील चैतन्यात पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. यातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान समष्टी कार्यात त्यांचे गुरु संत भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज, तसेच दत्त, श्रीकृष्ण, श्री लक्ष्मीदेवी, श्रीराम आणि श्री दुर्गादेवी या देवतांचे विशेष कृपाशीर्वाद लाभत आहेत’, असे यातून जाणवते.
समस्त सृष्टीला चैतन्य प्रदान करणार्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघराशी संबंधित संशोधनाच्या सेवेत आम्हा साधकांना सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्यांना अपेक्षित असे संशोधन करून घेण्याचा प्रयत्न त्यांनीच करवून घेतला, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.१२.२०२४)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |