प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रदर्शनातील संशोधनाच्या भागाकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले जात असल्याचे चित्र आहे. ‘रिपब्लिक टीव्ही’चे पत्रकार श्री. रंजीत श्रीयारा यांनी चांगले वार्तांकन केले. त्यांनी विश्वविद्यालयाचे श्री. कृष्णा मांडवा यांची प्रदर्शनाविषयी प्रदर्शन कक्षात लघुमुलाखत घेतली. यामध्ये आधुनिक उपकरणांद्वारे विश्वविद्यालय करत असलेल्या संशोधनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
‘तिलक वायटी’ या ३६ लाख अनुयायी असलेल्या वाहिनीने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. ज्योत्स्ना गांधी यांची २५ मिनिटे मुलाखत घेतली. या वेळी सूत्रसंचालकाने प्रदर्शनात लावलेल्या फलकांविषयी जाणून घेतले आणि ‘पुन्हा एकदा मुलाखतीसाठी नक्की येईन’, असे सांगितले.
या व्यतिरिक्त स्थानिक दैनिकांनी प्रदर्शनाविषयी वृत्त दिले. ‘गुड मॉर्निंग भारत’ या यू ट्यूब वाहिनीने वार्तांकन केले. ‘नवभारत टाइम्स’ या हिंदी वृत्तपत्राने याविषयी एक सखोल वार्ता सिद्ध केली आहे. ज्या वार्ताहरांना या प्रदर्शनाचा विषय कळतो, ते याविषयी वार्तांकन करण्यास उत्सुक असतात.