कार्तिक यात्रेसाठी कोल्हापूर येथून ११५ अधिक एस्.टी. गाड्यांचे नियोजन !

१२ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी भाविक आणि वारकरी यांच्या सोयीसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने ११५ अधिक एस्.टी. गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळीत झाली खासगी ट्रॅव्हल्स तिकिटांची ‘रेड बस’ॲपवर चढ्या दराने विक्री !

हिंदूंच्या सणांच्या काळात बेसुमार भाडेवाढ करणार्‍या खासगी टॅव्हल्सवर कारवाई होणार कि नाही ?

दीपावलीच्या निमित्ताने कोल्हापूर बसस्थानकावर प्रवासी आणि कर्मचारी यांना फराळाचे वाटप !

दीपावलीच्या निमित्ताने बाहेरील विभाग आणि बाहेरील आगारातील मुक्कामी चालक/वाहक यांचे अभ्यंगस्नान आणि फराळ यांची व्यवस्था कोल्हापूर आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. याचा लाभ १३५ कर्मचार्‍यांनी घेतला.

एस्.टी. महामंडळासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी संमत !

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सप्टेंबर २०२४ साठी सवलत मूल्याच्या रकमेची राज्य शासनाकडे विनंती केली होती. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने या विनंतीला मान्यता दिली आहे.

दीपावलीनिमित्त एस्.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या २५० अधिक फेर्‍या !

दीपावली झाल्यावर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेर्‍या ‘ऑनलाईन’ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दिवाळीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यांमध्ये दुप्पटीने वाढ !

हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कुणाचा वचक नसणे संतापजनक !

दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथे मुसलमान एस्.टी. वाहकाने काढली विद्यार्थिनीची छेड !

वासनांध मुसलमान ! भारतात महिलांवरील अत्‍याचारांच्‍या प्रकरणांमध्‍ये अशांचीच नावे वारंवार पुढे का येतात ? अशांवर सरकार काय कारवाई करणार ?

बसस्थानक आणि आगारे यांचा खासगी माध्यमातून पुनर्विकास करणार !

एस्.टी.च्या जागा खासगी आस्थापनांना भाडेतत्वावर देऊन एस्.टी.ला उत्पन्न मिळावे, यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. एस्.टी. स्थानक आणि आगार येथे विमानतळासारखे वातावरण निर्माण करण्यात येईल, तसेच तेथे खरेदीही करता येणार आहे.

उत्पन्नवाढीसाठी एस्.टी.महामंडळ चालक-वाहक यांना देणार प्रोत्साहन भत्ता

इंधन बचतीसाठी चालक आणि यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे.

अधिकाधिक जागा भाड्याने देऊन एस्.टी. विकासासाठी निधी उभारू ! – भरतशेठ गोगावले

या वेळी भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘‘वर्ष २००२ पासून एस्.टी. महामंडळाच्या जागा व्यावसायिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी ३० वर्षांकरता भाड्याने देण्यात येत होत्या.