एस्.टी. महामंडळासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी संमत !

राज्य शासनाचा निर्णय !

मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सप्टेंबर २०२४ साठी सवलत मूल्याच्या रकमेची राज्य शासनाकडे विनंती केली होती. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने या विनंतीला मान्यता दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने एस्.टी. महामंडळासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी संमत करत दिवाळीपूर्वी ही रक्कम वितरित करण्याचे नियोजन केले आहे. या निधीमुळे एस्.टी.च्या कर्मचार्‍यांना वेतन आणि इतर सुविधा यांसाठी आवश्यक अर्थसाहाय्य मिळाले आहे.