कोल्हापूर – दीपावलीच्या निमित्ताने १ नोव्हेंबर या दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवासी आणि कर्मचारी यांना फराळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी एस्.टी.चे आगार व्यवस्थापक अनिल म्हेत्तर, स्थानकप्रमुख मल्लेश विभुते, कार्यशाळाप्रमुख संकेत जोशी, साहाय्यक वाहतूक नियंत्रक दीपक घारगे यांसह अन्य उपस्थित होते.
याचसमवेत प्रत्येक वर्षीप्रमाणे दीपावलीच्या निमित्ताने बाहेरील विभाग आणि बाहेरील आगारातील मुक्कामी चालक/वाहक यांचे अभ्यंगस्नान आणि फराळ यांची व्यवस्था कोल्हापूर आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. याचा लाभ १३५ कर्मचार्यांनी घेतला.