‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप’द्वारे एस्.टी.ची सद्य:स्थिती आणि ठिकाण समजणार !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲप’ आणले आहे. प्रवाशांना एस्.टी.चे थांबे, बस स्थानकात बस किती वाजता येणार, हे २४ घंटे अगोदर कळेल.

सातत्याने अपघात होणार्‍या शिवशाही बसगाड्यांची पडताळणी !

गेल्या ८ वर्षांत शिवशाही बसगाड्यांचे शेकडो अपघात झाल्यानंतर जागे झालेले प्रशासन ! या अपघातांत प्रवाशांचा नाहक जीव जात असतांना त्याविषयी ठोस उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत ?

राज्यातील बसस्थानकांचा कायापालट करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान पुन्हा चालू करून बसस्थानकांचा कायापालट करणार, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

वाहतूककोंडीतून सुटका मिळवण्यासाठी मुंबईत केबल टॅक्सीचा प्रस्ताव ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात केबल टॅक्सी (केबलद्वारे वाहतूक करणारे वाहन) चालवण्याचा प्रस्ताव परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडला. पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी हीच पहिली घोषणा केली.

यंदा ३ सहस्र ५०० लालपरी बसगाड्या एस्.टी.च्या ताफ्यात भरती होतील !

वर्ष २०२५ मध्ये अनुमाने ३ सहस्र ५०० नवीन साध्या लालपरी बसगाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भरती करण्यात येतील, अशी घोषणा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

मुंबई-नाशिक मार्गावर ‘एल्.एन्.जी.’ बसगाड्यांचा समावेश होणार !

‘एल्.एन्.जी.’ची किंमत डिझेलच्या तुलनेत अल्प असल्याने एस्.टी. बस प्रवासाचा प्रति किलोमीटर ऑपरेटिंग खर्च न्यून होणार आहे. ‘एल्.एन्.जी.’च्या एका टाकीत बस ७०० ते ७५० कि.मी. पर्यंत धावू शकते

लाल बसने (‘एस्.टी.’ने) प्रवास करणार्‍यांच्‍या संख्‍येत पुणे विभागात ५० सहस्रांनी वाढ !

जनतेला सवलतींच्‍या सुविधा देणारे; पण प्रवासाची सोय न करणारे असंवेदनशील एस्.टी. महामंडळ काय कामाचे ?

निवडणूक विशेष

विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाने एस्.टी. प्राधिकरणाकडे ९ सहस्र २३२ बसगाड्यांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने एस्.टी.ने ती प्रक्रिया चालू केली आहे. यात पोलीस प्रशासनाकडून मागवलेल्या ४९० बसगाड्यांचाही समावेश आहे.

कार्तिक यात्रेसाठी कोल्हापूर येथून ११५ अधिक एस्.टी. गाड्यांचे नियोजन !

१२ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी भाविक आणि वारकरी यांच्या सोयीसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने ११५ अधिक एस्.टी. गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळीत झाली खासगी ट्रॅव्हल्स तिकिटांची ‘रेड बस’ॲपवर चढ्या दराने विक्री !

हिंदूंच्या सणांच्या काळात बेसुमार भाडेवाढ करणार्‍या खासगी टॅव्हल्सवर कारवाई होणार कि नाही ?