तुमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या, आता आरक्षण केव्हा मिळणार ? हे मुख्यमंत्र्यांना विचारा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ जानेवारी या दिवशी ‘एक्स’वर पोस्ट करत मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करून आपले मत व्यक्त केले आहे. 

मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करण्याची चेतावणी द्यावी लागते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीच्या मद्याची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाहतूक आणि विक्री केली जात आहे. मद्याची अवैध वाहतूक रोखावी, यासाठी आंदोलने करूनही या प्रकारांकडे डोळेझाक केली जात आहे.

राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणे बंधनकारक करा ! – मनसेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असून मागणी मान्य न झाल्यास जनचळवळ उभारून तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

अमित ठाकरे यांच्याकडून मला जिवे मारण्याचा प्रयत्न ! – महेश जाधव, माथाडी नेते यांचा आरोप

२० वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने वागवता. केवळ पैशासाठी काम करणारी ही संघटना आहे, असा आरोप मनसेचे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे १५ दिवसांत मराठी फलक न लावल्यास दुकाने बंद करणार ! – महापालिकेची चेतावणी

महापालिका प्रशासकांनी ७ जानेवारी या दिवशी शहरातील काही भागांत पहाणी करत दुकाने आणि प्रतिष्ठाने यांची नावे राज्यशासनाच्या आदेशानुसार मराठी भाषेत लिहिण्याचे निर्देश दिले, तसेच मोठ्या अक्षरात नावे लिहावे, असेही सांगितले आहे.

मराठा-ओबीसी हा वाद कुणीतरी घडवत असून आपण गाफील आहोत ! – राज ठाकरे, मनसे

महाराष्ट्र एकसंघ राहू नये; म्हणून सगळे प्रयत्न करत आहेत. आम्ही गाफील आहोत. ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात मराठी माणसाच्या भूमी काढून घेतल्या जात आहेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

रायगडमध्ये विमानतळ येत आहे. यानंतर इथे बाहेरच्या राज्यातील लोकांना जागा विकल्या जातील. भूमी काढून घेणे ही महाराष्ट्राविरोधातील सहकार चळवळ आहे. आम्ही मात्र जातीजातीमध्ये भांडत आहोत.

सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य न दिल्याने आयुक्तांचे त्वरित स्थानांतर करण्याची मनसेची मागणी !

महापालिकेवर प्रशासक म्हणून काम करतांना आयुक्तांनी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक आहे; मात्र विक्रम कुमार त्यांच्या कार्यकाळात लोकशाहीदिन बंद पडला असून जनता दरबार घेण्यास त्यांना वेळ मिळत नाही.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्‍वर मंदिराला मनसेने केले २५ सहस्र रुपये अर्पण !

महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला मिळत असलेल्या तुटपूंज्या निधीचे प्रकरण ! मालवण (जि. सिंधुदुर्ग), २४ डिसेंबर (वार्ता.) – येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्‍वर मंदिरातील पूजा-अर्चा, कार्यक्रम आणि देखभाल यांसाठी मनसेच्या वतीने २५ सहस्र रुपये अर्पण स्वरूपात मंदिराच्या पुजार्‍यांकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. या रकमेत प्रतिवर्षी वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक आणि … Read more

मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोणावळा (पुणे) येथील इतर भाषिक पाट्या हटवल्या !

येथील मराठी पाट्या नसणार्‍या दुकानांवर ४ डिसेंबर या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा नेला आणि इतर भाषिक पाट्या काढून टाकल्या. सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत दिलेली मुदत संपल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.