मराठीचा अवमान करणार्‍या सुरक्षारक्षकाला मनसेने क्षमा मागायला लावली !

संतप्त कार्यकर्त्यांनी कानशिलातही लगावली !

पवई – येथील ‘एल् अँड टी’ आस्थापनाच्या सुरक्षारक्षकाने ‘मराठी गया तेल लगाने ।’, असे म्हटले. या प्रकरणी संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या कानशिलात लगावून त्याला खडसावले आणि क्षमा मागायला लावली.

‘मी मराठीचा अपमान केला असून त्यासाठी राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राची मी क्षमा मागतो. मराठी माणसांचीही क्षमा मागतो. यापुढे मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करीन’, अशा शब्दांत त्याने क्षमा मागितली. गेल्या ४ वर्षांपासून मुंबईत असूनही मराठी भाषा कशी येत नाही ? अशा शब्दांत त्याला खडसावले होते.

संपादकीय भूमिका :

मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीचा अवमान होऊ नये, असेच स्थानिकांना वाटते. असा प्रकार अन्य राज्यांमध्ये झाल्याचे ऐकिवात नाही ! त्यामुळे मराठीची ही दुरवस्था रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरापासून जनजागृती करायला हवी !