मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना जिज्ञासू

मुंबई – दादर येथील शिवाजी मैदानात मराठी भाषा गौरवदिनानिमित्त २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत ‘अभिजात पुस्तक प्रदर्शना’चे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे. या मेळाव्‍यात सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. या मेळाव्‍यात अनेक प्रकाशकांनीही मराठी भाषांतील विविध पुस्तकांचे कक्ष लावले आहेत. या प्रदर्शनाला अनेक जिज्ञासूंकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे विविध मान्यवर जिज्ञासू सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळाविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा लाभ घेत आहेत.