चीनकडून शेजार्‍यांना धमकावणे आणि दहशत पसरवणे यांमुळे आम्ही चिंतेत ! – अमेरिका

अमेरिकेने केवळ अशी वक्तव्ये करून गप्प न बसता स्वतः चीनवर कारवाई करणे अपेक्षित आहे !  

प्रतिवर्षी २६ जुलैला वृद्धांच्या सन्मानार्थ दिन साजरा करणार ! – पोप फ्रान्सिस यांची घोषणा

पोप फ्रान्सिस यांनी २६ जुलै हा दिवस आजी आजोबा आणि वृद्ध यांच्या सन्मानार्थ साजरा करण्याची घोषणा केली. ‘नेहमी आपण आजी आजोबांना विसरतो; मात्र त्यांच्याकडे जीवन जगण्याचा मोठा अनुभव मिळू शकतो’, असे ते म्हणाले.

म्यानमारमध्ये सैन्याकडून सत्तापालट !

म्यानमारचे राष्ट्रपती विन म्यिंट, सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना सैन्याकडून अटक करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.

बलुची लोकांचे आंदोलन आणि भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी चीनकडून माझी नियुक्ती ! – पाकचे सैन्यप्रमुख जनरल अयमान बिलाल यांची स्वीकृती

यातून पाकिस्तान चीनला विकला गेला आहे, असेच स्पष्ट होते ! पुढे चीनने पाकच्या सैन्याला भारताच्या विरोधात युद्ध करण्यास प्रवृत्त केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कोरोनापेक्षाही १० पट भयंकर असेल भविष्यातील महामारी ! – बिल गेट्स यांची चेतावणी

‘कोरोनाची लागण ५ वर्षांपूर्वी झाली असती, तर त्यावरील औषध इतक्या लवकर बनवणे शक्य नव्हते,’

भारत सरकारने भेट दिलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याची अमेरिकेत तोडफोड

खलिस्तान समर्थकांवर संशय ! भारतातील गांधीप्रेमी आता खलिस्तान्यांच्या विरोधात बोलतील का ?

अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या तुलनेत श्‍वेतवर्णीयांना कोरोनाविरोधी लसीचे अधिक डोस

अमेरिकेत लसीकरणात वर्णद्वेष होत असल्याचे म्हटले जात आहे.

युरोपीय संघाकडून भारताला नव्हे, तर पाकच्या बासमती तांदळाला ‘जीआय’ टॅग !

बासमती तांदळाचे मूळ भारतात आहे, असा दावा भारताने केला होता. हा तांदूळ हा भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे पिकतो, पाकच्या या दाव्याला मान्यता देत पाकला ‘बासमती’ तांदळाच्या जगप्रसिद्ध जातीचा ‘जीआय टॅग’ मिळाला आहे.

चंद्राचा झोप आणि मासिक पाळी यांच्यावर होतो परिणाम ! – संशोधकांचा निष्कर्ष

उत्तर अर्जेंटिनातील फोर्मोसा भागातील टोबा-कूम हा आदिवासी समुदाय आणि सिएटलमधील साडेसात लाखांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचे निरीक्षण करून हे संशोधन करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘तैवानने स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा अर्थ युद्ध !’- चीनची धमकी

चीनचे त्याच्या शेजारी असणार्‍या २४ देशांशी सीमावाद आहे आणि त्यातून त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा स्पष्ट झाली आहे. चीनच्या विरोधात आता सर्वच देशांनी एकत्र येऊन त्याला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे !