(म्हणे) ‘तैवानने स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा अर्थ युद्ध !’- चीनची धमकी

चीनचे त्याच्या शेजारी असणार्‍या २४ देशांशी सीमावाद आहे आणि त्यातून त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा स्पष्ट झाली आहे. चीनच्या विरोधात आता सर्वच देशांनी एकत्र येऊन त्याला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे !

बीजिंग (चीन) – तैवानकडून स्वातंत्र्याच्या घोषणेची सिद्धता होत असल्यावरून चीनने युद्ध करण्याची धमकी दिली आहे. चीन तैवानला त्याचा भाग सांगत आहे.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू कियान यांनी म्हटले, ‘तैवानमधील मूठभर लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत.

(सौजन्य : South China Morning Post)

आम्ही स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या त्या लोकांना चेतावणी देत आहोत की, आगीशी खेळल्यास ते स्वतः जळून जातील आणि तैवानच्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे युद्ध !’