बलुची लोकांचे आंदोलन आणि भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी चीनकडून माझी नियुक्ती ! – पाकचे सैन्यप्रमुख जनरल अयमान बिलाल यांची स्वीकृती

यातून पाकिस्तान चीनला विकला गेला आहे, असेच स्पष्ट होते ! पुढे चीनने पाकच्या सैन्याला भारताच्या विरोधात युद्ध करण्यास प्रवृत्त केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! त्यामुळे भारताने त्यापूर्वीच आक्रमण करून पाकचा काटा कायमचा काढावा !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीनने मला बलूची लोकांचे आंदोलन चिरडण्यासाठी, तसेच भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी येथे तैनात केले आहे. मला या कार्यासाठी ६ मासांची समयमर्यादा दिली आहे. पाकचे सैन्य इराणमध्येही जाईल आणि त्याच्या विरोधातही कारवाई करील, असे विधान पाकचे सैन्यप्रमुख जनरल अयमान बिलाल यांनी केल्याचे वृत्त बांगलादेशचे दैनिक ‘द डेली सन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जनरल अयमान बिलाल यांनी म्हटले, 

 (सौजन्य : NewsX)

‘चीनने मला वेतन आणि मोठी रक्कम दिली आहे. त्याने मला अधिकृतपणे त्याच्या हितांचे, तसेच ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या विरोधात ईराण रचत असलेली षड्यंत्रे हाणून पाडण्यासाठी, तसेच भारताचा वाढता प्रभाव नष्ट करण्यासाठी तैनात केले आहे. ही एकक्षेत्री हितांसाठी करण्यात आलेली एक प्रकारची गुंतवणूक आहे.’