प्रतिवर्षी २६ जुलैला वृद्धांच्या सन्मानार्थ दिन साजरा करणार ! – पोप फ्रान्सिस यांची घोषणा

व्हॅटिकन सिटी – पोप फ्रान्सिस यांनी २६ जुलै हा दिवस आजी आजोबा आणि वृद्ध यांच्या सन्मानार्थ साजरा करण्याची घोषणा केली. ‘नेहमी आपण आजी आजोबांना विसरतो; मात्र त्यांच्याकडे जीवन जगण्याचा मोठा अनुभव मिळू शकतो’, असे ते म्हणाले.