‘भारतात धार्मिकद्वेष आणि भेदभाव केला जातो’, असा आरोप करणार्या अमेरिकेतील संस्था, संघटना आणि सरकार हे त्यांच्या स्वतःच्या देशातील या वर्णद्वेषावर गप्प का ?
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत लसीकरणात वर्णद्वेष होत असल्याचे म्हटले जात आहे. येथे कृष्णवर्णीयांच्या तुलनेत श्वेतवर्णीयांमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये कृष्णवर्णीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
१. अमेरिकेच्या १४ राज्यांच्या लसीकरणामध्ये कृष्णवर्णीयांच्या तुलनेत श्वेतवर्णीय नागरिकांना जवळपास दोन तृतीयांश अधिक लसीकरण झाले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४ टक्के श्वेतवर्णीयांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे, तर १.९ टक्के कृष्णवर्णीयांना कोरोना लस देण्यात आली आहे.
२. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये कृष्णवर्णीय नागरिकांचे प्रमाण अधिक आहे, तसेच कोरोनाबाधितांमध्येही कृष्णवर्णीयांची संख्या श्वेतवर्णीयांच्या तुलनेत ४ पट अधिक असल्याची माहिती अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिजीस् कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन’ने दिली आहे.