अमेरिकेने केवळ अशी वक्तव्ये करून गप्प न बसता स्वतः चीनवर कारवाई करणे अपेक्षित आहे !
वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही सीमेवरील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. भारत आणि चीन यांच्या दोन्ही सरकारमध्ये चर्चा चालू असल्याचे आम्हाला ठाऊक आहे. सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी संवाद आवश्यकच आहे, त्याचे आम्ही समर्थन करतो; मात्र चीनकडून शेजार्यांना धमकावणे आणि दहशत पसरवणे यांमुळे आम्ही चिंतेत आहोत, असे प्रतिपादन अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली जे होर्न यांनी केले.
The Biden administration has voiced concern over Beijing’s ongoing attempts to “intimidate” its neighbours and said it was closely monitoring the situationhttps://t.co/ncajusHfXY
— WION (@WIONews) February 2, 2021
भारताच्या सीमेमध्ये घुसून त्याच्या भूमीवर नियंत्रण मिळवण्याच्या चीनच्या प्रयत्नावर पत्रकारांनी होर्न यांना प्रश्न विचारला. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले. हिंद महासागर परिसरात शांतता, समृद्धी आणि सुरक्षा प्रस्थापित ठेवण्यासाठी आम्ही मित्रांच्या, भागीदारांच्या आणि सहकार्यांसमेत उभे राहू.