दाभोळे येथील श्री गणपति मंदिरातील अर्पणपेट्या फोडल्या

दाभोळे, पोखरबाव येथील श्री गणपति मंदिरातील अर्पणपेट्या फोडून अज्ञात चोराने अंदाजे ४ सहस्र ८०० रुपये चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी श्री. विठ्ठल बाळकृष्ण राऊत यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे.

मंदिरांवरील आक्रमणास मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी कारणीभूत ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

महंमद बिन कासीम याने पहिल्यांदा मंदिरावर आक्रमण केले. त्या वेळेपासून मंदिरांवर जिहादी आक्रमण होत आहे.

हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – नागेंद्रदास प्रभू, इस्कॉन

बांगलादेश येथे झालेल्या घटनेचा भारत सरकार, भारतातील हिंदू यांनी कठोर विरोध करावा आणि या विरोधात होणार्‍या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे. या प्रकरणी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही भारत सरकारकडे करतो….

फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) येथील श्री बिसारी देवीच्या मंदिराची बौद्धांकडून तोडफोड

भगवा ध्वज काढून पंचशील ध्वज फडकावला !
मंदिराची हानीभरपाई करण्याचे उपजिल्हाधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन

मंगळुरू येथील देवस्थानात अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि चोरी

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर अशी आक्रमणे होणे अपेक्षित नाही. सर्व मंदिरांना सरकारने सुरक्षा द्यावी, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशमध्ये एकूण ३३५ मंदिरांवर आक्रमणे, तर हिंदूंच्या १ सहस्र ८०० घरांची जाळपोळ ! – ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’च्या बांगलादेश शाखेची माहिती

भारतातील एखादी मशीद किंवा चर्च यांवर दगड भिरकावल्याची अफवा जरी पसरली, तरी संपूर्ण देश डोक्यावर घेतला जातो आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटना भारताला उपदेशाचे डोस पाजू लागतात !

हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारताचा शेजारी देश असणार्‍या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.

सिरूवाचूर (तामिळनाडू) येथे कालीअम्मन मंदिराच्या परिसरातील हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची तोडफोड !

तामिळनाडूत हिंदुद्वेषी द्रमुक पक्ष सत्तेत असल्यामुळे तेथे हिंदूंद्वेष्ट्यांवर काही कारवाई होईल, अशी अपेक्षा नाही. तमिळनाडूत हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन हवे !

इस्कॉनच्या मंदिरावर आक्रमण करून २ साधू आणि १ भाविक यांची हत्या

पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; मात्र त्याचा कोणताच परिणाम धर्मांधांवर झालेला नाही किंवा शेख हसीना त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, यातूनच हे आक्रमण झाल्याचे लक्षात येते !

माहीम (मुंबई) येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद !

माहीम येथील पुरातन आणि जागृत देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणी माहीम पोलिसांनी ७ ऑक्टोबरला रात्री उशिरा मंदिर विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदवला. यामध्ये देवस्थानचे विश्वस्त जयवंत देसाई, शैला पठारे, पद्माकर साहनी आणि संजीव परळकर यांना आरोपी करण्यात आले आहे