बांगलादेशात नवरात्रीत हिंदू आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर झालेल्या आक्रमणाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन
अशी मागणी का करावी लागते ? शासनकर्ते स्वत:हून कृती का करत नाही ? – संपादक
बेळगाव, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – बांगलादेश येथे झालेल्या घटनेचा भारत सरकार, भारतातील हिंदू यांनी कठोर विरोध करावा आणि या विरोधात होणार्या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे. या प्रकरणी हिंदूंची मंदिरे आणि हिंदू यांवर आक्रमणे करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही भारत सरकारकडे करतो, असे आवाहन ‘इस्कॉन’चे श्री. नागेंद्रदास प्रभू यांनी केले. बांगलादेश येथे नवरात्रीत हिंदूंवर आणि ‘इस्कॉन’च्या मंदिरावर झालेल्या आक्रमणाप्रकरणी धर्मांधांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २२ ऑक्टोबर या दिवशी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. हृषिकेश गुर्जर यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी ‘इस्कॉन’चे श्री. अमित नाईक, श्री. राजनारायन प्रभू, श्री. मदन देशपांडे, श्री संजीव रेणके, श्री. मंजुनाथ रेणके, श्री. प्रशांत रेणके, ‘हमारा देश’ संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे, श्री. संदीप भिडे, श्री. सचिन इनामदार, श्री. उमेश नायक, श्री. एम्.बी. कोंकणी, भाजपचे श्री. मारुति सुतार, हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिल कुरांकर, धर्मप्रेमी श्री. सदानंद मासेकर, ‘क्रांती महिला मंडळा’च्या सौ. अक्काताई सुतार आणि सौ. मीलन पवार, ‘युवा ब्रिगेड’चे श्री. राहुल वाघमारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन कारेकर, कु. सरिता मुगळी यांसह ३० हून अधिक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, भाविक उपस्थित होते.