बांगलादेशमध्ये एकूण ३३५ मंदिरांवर आक्रमणे, तर हिंदूंच्या १ सहस्र ८०० घरांची जाळपोळ ! – ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’च्या बांगलादेश शाखेची माहिती

भारतातील एखादी मशीद किंवा चर्च यांवर दगड भिरकावल्याची अफवा जरी पसरली, तरी संपूर्ण देश डोक्यावर घेतला जातो आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटना भारताला उपदेशाचे डोस पाजू लागतात ! बांगलादेशात एवढ्या मोठ्या संख्येने हिंदूंच्या मंदिरांवर आणि हिंदूंवर आक्रमण होऊनही हिंदू कुंभकर्णी झोपेत आहेत ! हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक

ढाका (बांगलादेश) – ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’च्या बांगलादेश शाखेने दिलेल्या माहितीनुसार १३ ते १७ ऑक्टोबर या ४ दिवसांच्या कालावधीत बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या आक्रमणांत ३३५ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. तसेच हिंदूंची १ सहस्र ८०० घरे जाळण्यात आली. हिंदूंवरील आक्रमणांच्या घटना अद्याप थांबलेल्या नाहीत. देशातील कॉमिला, चाँदपूर, नोआखाली, चटगाव, कॉक्स बाजार, फेनी, चपई, नवाबगंज आणि रंगपूर येथे सर्वाधिक आक्रमणे झाली. यांत एकूण १२ हिंदूंच्या हत्या झाल्या ज्यांमध्ये ७ पुजार्‍यांचा समावेश होता. तसेच २३ मुली आणि महिला यांच्यावर बलात्कार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’कडून या आक्रमणांत हानी झालेल्या हिंदूंना साहाय्य करण्यात येत आहे. ज्यांना आर्थिक साहाय्य करायचे आहे, ते या फेडरेशनला ऑनलाईन पैसे पाठवू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे. याविषयी संस्थेच्या संकेतस्थळावर संपर्क करता येऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. संकेतस्थळाचा पत्ता : http://www.worldhindufederation.org/