मंदिरांवरील आक्रमणास मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी कारणीभूत ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी यांमुळे धर्मांधांकडून मंदिरांवर आक्रमण होत आहेत. महंमद बिन कासीम याने पहिल्यांदा मंदिरावर आक्रमण केले. त्या वेळेपासून मंदिरांवर जिहादी आक्रमण होत आहे. जे मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत, ते मंदिरात घुसू पहात आहेत. जर तुम्ही मूर्तीपूजेच्या विरोधात आहात, तर तुम्ही मंदिरात का येऊ इच्छिता ? सर्वप्रथम आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा स्वीकार करा आणि त्यानंतर मंदिरात या. असे केल्यास कुणालाच कोणताही आक्षेप नाही.