मंगळुरू येथील देवस्थानात अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि चोरी

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर अशी आक्रमणे होणे अपेक्षित नाही. सर्व मंदिरांना सरकारने सुरक्षा द्यावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

देवस्थानातील मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड

मंगळुरू (कर्नाटक) – येथे १६ ऑक्टोबरच्या रात्री बैकमपाडी करकेरा येथील जरांडाय देवस्थान आणि नागा ब्रह्मपीठ यांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. अज्ञातांनी देवस्थानातील नागा मूर्ती आणि नंदी यांचीही नासधूस केली. तसेच मंदिरातील कपाट तोडून मौल्यवान साहित्य चोरून नेण्यात आले.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक