गौण खनिजाचा अवैध उपसा करणार्‍यांकडून ९ कोटी रुपयांचा दंड वसूल !

जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन चालू होते. गत ७ – ८ मासांत २२४ ठिकाणी कारवाई करत जिल्हा प्रशासनाने ९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

Corruption In Goa Elections : निवडणुकीतील आर्थिक गुन्हे रोखणार्‍या पथकातील दोघे भ्रष्टाचारामुळे निलंबित

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! पथकातील कर्मचारीच भ्रष्ट, तर निवडणूक चांगली होण्यासाठी कोण घेणार कष्ट ?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच, यावर आम्ही आजही ठाम ! – उद्योगमंत्री उदय सामंत

कोकण विभागात भाजपला जागा नसल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.

मान्सूनपूर्व कामे मेपर्यंत पूर्ण करा ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी

येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मान्सूनपूर्व कामे मेपर्यंत पूर्ण करा, तसेच पुरामुळे बाधित होणार्‍या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कृती आराखडा सिद्ध ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

तळेगाव (जिल्हा पुणे) रेल्वेस्थानक परिसरातील स्मशानभूमी २ वर्षांपासून बंद !

अत्यंत महत्त्वाच्या सुविधेपासून जनता दोन वर्षे वंचित असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! असे असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !

HJS Campaign SURAJYA ABHIYAN : उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या तिकिटांच्या दरावर नियंत्रण आणा !

बेकायदेशीर ‘ॲग्रीगेटर ॲप्स’वर कारवाई करण्याची मागणी ‘सुराज्य अभियान’ करत आहे, तसेच ‘प्रवासी वाहतुकीसंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी वाहतूक खात्याने ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसिद्ध करावा’, अशीही मागणी ‘सुराज्य अभियान’ने केली आहे.

Students Thrashed Drunk Teacher : वर्गात दारू पिऊन येऊन मुलांना शिवीगाळ करणार्‍या शिक्षकाला मुलांनी चपलांनी चोपले !

अशांची शिक्षक म्हणून भरती कशी होते ? आणि ते वर्गात काय करतात, हे मुख्याध्यापक पहात नाही का ?

सदानंद दाते राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (‘एन्.आय.ए.’चे) नवीन महासंचालक

केंद्र सरकारने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.

Power Of IAF : राजकीय इच्छाशक्ती असेल, तर शत्रूच्या हद्दीत घुसूनही वायूदलाची शक्ती दाखवता येते !

वायूदल हे राष्ट्रीय क्षमतेचे प्रतीक, शांतता आणि सहकार्याचे साधन म्हणून काम करील. भविष्यातील युद्धे अधिक प्राणघातक असतील आणि साहजिकच प्रसारमाध्यमांच्या तीक्ष्ण दृष्टीसमोर हे सर्व घडेल.

नोंदणी (रजिस्ट्रेशन) कार्यालय आणि मानक कार्यप्रणाली (एस्.ओ.पी.)ची आवश्यकता !

‘कोणत्याही उपनिबंधक (सब रजिस्ट्रार) कार्यालयामध्ये गेले की, पहिले नेमके कुणाला काय विचारावे ? हेच कळत नाही. ‘नवा गडी नवे राज्य’ या प्रकाराने नव्याने कार्यभाग साधला जातो. त्यामुळे हाताखाली काम करणार्‍या कर्मचार्‍यांची त्रेधा तिरपीट उडत असते.