वायूदल प्रमुख विवेक राम चौधरी यांची स्पष्टोक्ती !
नवी देहली : राजकीय इच्छाशक्ती असेल, तर शत्रूच्या हद्दीत घुसूनही वायूदलाची शक्ती दाखवता येते, हे पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटसारख्या कारवाईने दाखवून दिले आहे, असे विधान भारतीय वायूदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी केले. ते येथे आयोजित ‘एरोस्पेस पॉवर इन फ्युचर कॉन्फ्लिक्ट्स’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.
(सौजन्य : ANI)
ते म्हणाले की,
आपण आकाशाच्या काही भागांमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहोत. यासाठी आपल्या वायूदलाची शक्ती यामध्ये मोठी भूमिका बजावेल. वायूदल हे राष्ट्रीय क्षमतेचे प्रतीक, शांतता आणि सहकार्याचे साधन म्हणून काम करील. भविष्यातील युद्धे अधिक प्राणघातक असतील आणि साहजिकच प्रसारमाध्यमांच्या तीक्ष्ण दृष्टीसमोर हे सर्व घडेल.
Indian Air Force (IAF) #CAS Air Chief Marshal Vivek Ram Choudhari's candid speech.
If political will permits, IAF can flex its muscles even inside the enemy's territory.
#Aerospace #Balakot #FutureWarfare #IAFChief pic.twitter.com/KX9kDUrn9s
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 27, 2024