Supreme Court told Governor : देशातील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी आत्मपरीक्षण करावे ! – सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

पंजाब सरकारने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

आरोपींकडून ११ कोटी रुपये वसूल करणार ! – नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक

आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे. आरोपींकडून अनुमाने ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्वत:ला देव समजतात ! – गुजरात उच्च न्यायालय

न्यायालयांनी जनताद्रोही पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना फटकारून न थांबता त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमा स्पर्धेवर बंदी घालण्याची वेंगुर्ला येथील नागरिकांची मागणी

भगवान श्रीकृष्णाच्या ऐवजी नरकासुररूपी दैत्यालाच देव करणार्‍या आणि प्रतिवर्षी वाढत चाललेल्या ‘नरकासुर प्रतिमा स्पर्धा’ या विकृतीला आमचा विरोध आहे. या ‘विकृत आणि विद्रूप’ स्पर्धेवर बंदी घालावी आणि संस्कृती अन् तरुण पिढी यांना वाचवावे.

अहिल्यानगर येथील साहाय्यक अभियंत्याला १ कोटी रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले !

अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना पुन्हा कुणी असा गुन्हा करू धजावणार नाही, अशी कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

सनातन धर्माविषयी अवमानकारक विधाने (हेट स्पीच) करणार्‍यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट !

सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांत देण्यात आले.

Remove Loudspeakers On Mosque दवर्ली येथील मशिदीवरील भोंगे हटवा !

कोळसा वाहतुकीमुळे होणार्‍या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणार्‍या आणि समुद्रकिनार्‍यांवरील पार्ट्यांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ?

‘ईडी’ चे अधिकारी नवलकिशोर मीणा यांना १५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक !

भ्रष्टाचार निपटण्याचे दायित्व असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारीच भ्रष्ट असले, तर भ्रष्टाचार न्यून कधी होणार ? ‘अशा भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे’, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते !

राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमदेवारांना वगळायला हवे !

सध्या कायदे करणारे लोकप्रतिनिधी नवीन संसद भवनात स्थलांतरित झाले आहेत; परंतु ‘माननीय’ म्हणवले जाणारे खरोखरच आता कुणी शेष आहेत का ? याचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’, असे आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण पथकावर दगडफेक करून साहाय्‍यक आयुक्‍तांना मारहाण !

‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशी वृत्ती नष्‍ट होण्‍यासाठी गुन्‍हेगारांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !