सदानंद दाते राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (‘एन्.आय.ए.’चे) नवीन महासंचालक

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते

नवी देहली – केंद्र सरकारने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. दाते यांनी मुंबईत सहपोलीस आयुक्तपदावरही काम केले आहे. याखेरीज ते मिरा-भाईंदरचे पोलीस आयुक्तही होते. मुंबईत २९ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी कामा रुग्णालयात त्यांनी आतंकवाद्यांविरुद्ध लढाही दिला होता. गेल्या ३० वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस सेवेतील प्रदीर्घ अनुभवांच्या आधारावर त्यांनी ‘वर्दीतील माणसांच्या नोंदी’ हे पुस्तक लिहिले आहे.