सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन चालू होते. गत ७ – ८ मासांत २२४ ठिकाणी कारवाई करत जिल्हा प्रशासनाने ९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. अवैध कामे करणार्यांनी ती बंद करावीत. कुणी गुंडगिरी करत शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रास दिला, तर सोडणार नाही, अशी चेतावणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. अवैध गौण खनिज कारवाईची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘गौण खनिजाचे अवैध उत्खनन, तसेच वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई केली. महसूल विभागाने १०० वाहने शासनाधीन करत ९ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. सातारा जिल्ह्यात २३४ क्रशर आहेत, त्यांची तपासणी केली असता ५७ क्रशर अनधिकृत आहेत. त्यापैकी कागदपत्रांची पूर्तता करून १४ क्रशर रीतसर चालू ठेवण्यात आले असून उर्वरित ४३ अनधिकृत क्रशर बंद करण्यात आले आहेत.’’ (एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध क्रशर कसे आले, हेही पहाणे आवश्यक आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअवैध उपसा होणारच नाही, यासाठीही प्रयत्न करावेत ! |