पिंपोडे जिल्‍हा सातारा ग्रामीण रुग्‍णालयातील आधुनिक वैद्याने कर्तव्‍यावर असतांना केले मद्यप्राशन !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, ८ डिसेंबर (वार्ता.) – कोरेगाव तालुक्‍यातील पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्‍णालयात कर्तव्‍यावर असतांना आधुनिक वैद्य अरुण मच्‍छिंद्रनाथ जाधव यांनी मद्यप्राशन केल्‍याचे उघड झाले आहे. जाधव यांच्‍याविरुद्ध वाठार पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. जाधव यांच्‍या संदर्भातील ही तिसरी घटना असून रुग्‍णाच्‍या जीवाशी खेळणार्‍या अशा आधुनिक वैद्यावर जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सकांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. (पहिल्‍यांदाच कठोर कारवाई न केल्‍याचा परिणाम ! – संपादक)

जावेद आतार हे त्‍यांच्‍या नातेवाईकाची चौकशी करण्‍यासाठी रुग्‍णालयात गेले होते. त्‍या वेळी तेथील परिचारिकेने आधुनिक वैद्य प्रसुतीगृहामध्‍ये विश्रांती घेत असल्‍याचे त्‍यांना सांगितले. आतार त्‍यांची भेट घेण्‍यासाठी प्रसूतीगृहामध्‍ये गेले असता ते मद्यधुंद अवस्‍थेत भूमीवरती पडलेले आढळून आले.

संपादकीय भूमिका :

असे वैद्य समाजासमोर काय आदर्श निर्माण करणार ?