UP Minister On HOLI : ज्यांना होळीच्या रंगांची अडचण असेल, त्यांनी देश सोडून जावे !

उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आणि निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांचे विधान

निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – होळीमुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारते. त्यामुळे आपोआप सर्वांच्या घरी सुख आणि शांती यांचे आगमन होते. सण हे आनंद साजरा करण्यासाठी असतात. सणांच्या निमत्ताने लोक आपसांतील कटुता दूर करण्यासाठी पुढाकार घेतात आणि एकमेकांची गळाभेट घेतात.

त्यामुळे ज्यांना रंगांची अडचण असेल त्यांनी केवळ त्यांचे घर नव्हे, तर हा देश सोडून निघून जावे, असे विधान उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आणि निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांनी केले.