Gujarat Muslims Oppose Holi : गुजरातमधील मेनी गावातील मुसलमानांकडून हिंदूंना होळी साजरी करण्यापासून रोखण्याचा केला प्रयत्न

मेनी गावातील पीडित हिंदू

कर्णावती (गुजरात) – कर्णावतीच्या बावला तालुक्यातील मेनी गावातील हिंदूंचा आरोप आहे की, मुसलमान समुदायातील काही लोकांनी त्यांना होळी साजरी न करण्याची धमकी दिली.या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यात गावकरी तक्रार करतांना दिसत आहेत.

१. विश्व हिंदु परिषदेचे धांधुका येथील पदाधिकारी नितीनभाई चौहान यांनी सांगितले की, मेनी गावात ४० टक्के हिंदु आणि ६० टक्के मुसलमान आहेत. आजूबाजूची गावेही मुसलमानबहुल आहेत. गेल्या २ वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा त्यांचा दावा आहे. हिंदु महिलांची छेड काढण्यात आल्याच्या तक्रारी आल्या. काही दिवसांपूर्वी  एका हिंदु महिलेचा विनयभंग झाला, तेव्हा तिच्या पतीने विरोध केला. यानंतर मुसलमानांनी त्याला मारहाण केली. आता होळीच्या निमित्ताने लोकांना धमक्या दिल्या जात आहेत की, ‘आम्ही तोडफोड करू आणि तुम्ही होळी कशी साजरी करता ते पाहू ?’ हिंदूंनी शांतता राखण्यासाठी पोलीस आणि सरकार यांचे साहाय्य घेतले. आमची तक्रार ऐकली गेली नाही; पण पोलिसांनी मुसलमानांची तक्रार मात्र लगेच नोंदवून घेतली. (अशा पोलिसांवर भाजप सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

२. हिंदूंचे म्हणणे आहे की, पोलीस आधी तक्रार घेत नव्हते; परंतु व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर त्यांना तसे करण्यास भाग पाडले गेले. एका महिलेने सांगितले की, पोलीस घटनास्थळी येतही नाहीत.

३. दुसरीकडे कर्णावती ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की, हे धार्मिक सूत्र नाही. हा दोन शेजारील शेतकर्‍यांमधील भूमीचा वाद होता, जो मिटवण्यात आला.

४. नलसरोवर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमी घोरी यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंच्या तक्रारी घेण्यात आल्या आहेत आणि कोणताही भेदभाव केलेला नाही. गावात बंधुभावाने होळी साजरी केली जाईल.

५. हिंदु संघटनांचे म्हणणे आहे की, मुसलमानांनी हिंदूंची भूमी खोदली आणि शेतीकडे जाणारा मार्ग रोखला. ‘कोणतीही हिंदु संघटना आली, तरी आम्ही तुम्हाला गावात राहू देणार नाही’, अशी धमकी दिली. होळीचे सूत्र लपवण्यासाठी भूमीच्या वादाचे सूत्र उपस्थित करण्यात आल्याचा दावा विहिंपने केला आहे.

६. विहिंपचे चौहान म्हणाले की, उस्मान सम नावाच्या व्यक्तीने मुसलमानांना सांगितले आहे की, तो त्यांना ५० सहस्र रुपये देईल, कुणीही मागे हटू नये.

संपादकीय भूमिका

गुजरातमध्ये अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अशी स्थिती येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !